PUNE | शिरुरमधील महिलेवर हल्ला करणारा आरोपी अटकेत, महिलेचे डोळे फोडण्याचा नराधमाचा विचित्र प्रकार
तीन दिवसांनंतर देखील शिरुर हल्ला प्रकरणात आरोपी कोण हे स्पष्ट नाही, आज या महिलेची विधानपरिदषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केलीय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावामध्ये एका महिलेवर हल्ला करून तिचे दोन्ही डोळे निकामी करण्यात आलेत . हल्लेखोराने या महिलेवर अति अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केलाय. या महिलेवर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता ही महिला शौचाला जाण्यासाठी तिच्या घराच्या बाहेर आली असता हल्लेखोराने तिच्यावर हल्ला केला या हल्ल्यांमध्ये तिचा एक डोळा बाहेर येऊन जमिनीवर पडला तर दुसऱ्या डोळ्यालाही गंभीर दुखापत झाली .या हल्लेखोराने या महिलेवर अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला.