Ulhasnagar Camp No.4 मध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर चाकूने जीवघेणा हल्ला, पोलीस गंभीर जखमी

Continues below advertisement

काल मध्यरात्री पैश्याचा व्यवहारातून दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू होती. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर हत्यार उगरले होते. दरम्यान तेथे गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड यांनी हा सगळा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका गटाने पोलिसांवर चाकूने वार करुन त्यांना गंभीर जखमी केलं. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणून गंभीर दुखापत या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram