Pimpari - Chinchwad : शरद पवारांचा आवाज काढून मागितली चक्क पाच कोटींहून अधिक रक्कम ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या याचा आवाज काढून व्यवहारात पैश्यांची मागणी केल्याचं समोर आलंय. यामुळं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुण्याच्या चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. प्रताप खंडेभराड यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी धीरज पठारेने गुरव नामक व्यक्तीला शरद पवारांच्या आवाजात फोन केला. किरण काकडे याने पवारांचा पीए असल्याचं भासवले. व्याजाने घेतलेल्या पैशातून हा प्रकार घडलाय. एक कोटींहून अधिकची रक्कम प्रताप यांना धीरज यांनी 2014 मध्ये दिली. त्यात व्याज लावून साधारण पाच कोटींच्या वर रक्कम मागत होता. त्या पोटी त्यांनी तेरा एकर जमीन ही घेतली. तरीही तो पैशाची मागणी करत राहिला. ते देत नसल्याने शेवटी त्याने शरद पवारांच्या आवाजाचा आधार घेतला.
यासाठी सॉफ्टवेअरचा आधार घेत पवारांच्या मुंबई येथील लँडलाईन नंबर वरून कॉल केल्याचं दाखवलं आणि त्यांचा आवाज काढून पैशांची ही मागणी केली. याप्रकरणी एक गुन्हा मुंबईत तर दुसरा गुन्हा चाकण मध्ये दाखल झाला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. गुन्ह्यातील तिघांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहे.