Mumbai Drugs : मुंबईतल्या वकीलाचा ड्रग्ज निर्मिती, तस्करीचा गोरखधंदा, पोलिसांकडून पर्जाफाश ABP Majha
Continues below advertisement
कायद्याचा अभ्यास केलेलेच जेव्हा कायदा धाब्यावर बसवतात... त्याविषयीची बातमी... मुंबईत पेशानं वकील असलेला माणूस ड्रग्ज फॅक्टरी चालवायचा, असं सांगितलं तर... विश्वास बसत नसलं तरी हे वास्तव आहे. कारण मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं वकिलाचा गोरखधंदा उघड केलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजकुमार राजहंस हे वकील कोल्हापुरातील चंदगड परिसरात पोल्ट्री फार्मच्या नावे मेेफेड्रेन बनवण्याचा कारखाना चालवायचे. आणि कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करुन ड्रग्ज पुरवठ्याचं कामही करायचे. ठरलेल्या ड्रग्ज तस्करांना राजकुमार नियमितरित्या ड्रग्ज पुरवायचे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एका महिलेसह दोघांना बेड्या ठोकल्यात. पण त्यातील मुख्य आरोपी वकील राजकुमार राजहंस अजूनही फरार आहेत.
Continues below advertisement