न्या.Dipankar Datta यांच्याकडून Shraddha Murder Case चा उल्लेख करत Cyber Crime बाबत चिंता व्यक्त
मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा उल्लेख करत सायबर गुन्हांबाबत चिंता व्यक्त केली. शनिवारी पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा उल्लेख केला. इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती सहज उपलब्ध झाल्यानं होणाऱ्या दुष्परिणामांकडे त्यांनी लक्ष वेधलं. हे प्रकरण म्हणजे याचंच उदाहरण आहे, असं न्यायमूर्ती दत्ता म्हणाले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं.