कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा मुलींचा आरोप, व्हिडीओ मिळालेला नसल्याचं पोलिसांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधीमंडळात उमटले. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावलं गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की या पोलिसांचं निलंबन करावे, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमाने कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे.
Continues below advertisement