Jalgaon : तरुणांकडून भुताटकीचा दावा करणारा Fake Video Viral, पोलिसांकडून तरुणांविरुध्द गुन्हा दाखल
काही मुलांनी धड नसलेल्या मुलासोबत उलट पायांवर चालत असलेल्या एका महिलेचं खोटं चित्रण करून भुताटकी चा प्रकार असल्याच भासवत सदर क्लिप सोशल मीडियावर वायरल केल्याची घटना समोर आली आहे. या क्लिप मुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने सदर क्लिप वायरल करण्यास पोलिसांनी निर्बंध लावले असून सदर तरुणांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.