Child Pornography : चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी Jalgaon आणि Dhule मध्ये CBI चौकशी : ABP Majha

Continues below advertisement

चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि लैंगिक छळ प्रकरणी सीबीआयनं जळगाव-धुळ्यासह देशभरात 14 राज्यांमध्ये कारवाई केल्याची माहिती समोर आलीय. सेक्स स्कँडलमुळे बदनाम झालेल्या जळगावचं नाव या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सीबीआयच्या पथकानं जळगावातल्या एका गावात येऊन एका शेतकऱ्याच्या घरात झडती घेतली आणि चौकशी केली. स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शेतकऱ्याच्या घरातून एक मोबाईल जप्त करण्यात आल्याचं कळतं. या घटनेत शेतकऱ्याच्या मुलानं वडिलांच्या मोबाईलवरून काही लिंक शेअर केल्या असल्याचा संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं पिता-पुत्राला नागपूर इथं चौकशीसाठी बोलावल्याचं सांगण्यात येतंय. बातमीतून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे चाईल्ड पोर्नोग्राफी हा अतिशय गंभीर गुन्हा आहे.. एखादा व्हिडीओ गमतीनं किंवा नजरचुकीनं पुढे पाठवणंही महागात पडू शकतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram