Dahisar : भरदिवसा SBI च्या दहिसर शाखेत गोळीबार! हल्ल्यात एक जखमी, आरोपी फरार
दहिसरमध्ये भरदिवसा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. दरोडेखोरांनी अडीच लाख रुपये घेऊन बँकेतून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.