Nitesh Rane: गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणे अजूनही नॉट रीचेबल ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 04:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितेश राणे आहेत कुठे या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलं नसताना आता त्यांचा ठावठिकाणा सांगण्यास नारायण राणेंनीही नकार दिला. काल नागपूर दौरा अर्धवट सोडून कणकवलीत परतलेल्या नारायण राणेंनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. जिल्हा बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी नितेश राणेंवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, आणि त्यासाठी सत्तेचा गैरवापर होतोय, असा आरोप राणेंनी केलाय. राज्यभरातून मोठा पोलीस बंदोबस्त कणकवलीत पोहोचलाय त्यावरूनही राणेंनी टोला लगावलाय