सोशल मीडियावर मुलासोबत भांडल्यानंतर वडिलांची निर्घृण हत्या, नागपूर पोलिसांकडून तिघांना अटक
नागपूरच्या पांढराबोडी परिसरात एका इसमाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येच्या या घटनेमागे मृतकाच्या मुलाचा सोशल मीडिया वर गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपी सोबत एका मेसेजला घेऊन झालेला वाद कारणीभूत ठरला आहे. अशोक नहारकर (40 वर्ष ) असे मृतकाचे नाव असून काल रात्री अकराच्या सुमारास नहारकर कुटुंबीय झोपण्याच्या तयारीत असताना अचानक त्यांच्या घरावर अनेक लोकांनी दगड, विटा, चाकू आणि लोखंडी रॉड घेऊन हल्ला केला.