Nalasopara Police | नालासोपाऱ्यातील तरुणीच्या आत्महत्येला पोलीस जबाबदार, मृत मुलीच्या कुटुंबाचे आरोप

Continues below advertisement

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेची संपूर्ण देशात चर्चा  असतानाच मुंबईहून जवळच असलेल्या नालासोपा-यात एका 19 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आई वडीलांनी या घटनेसाठी थेट पोलिसांवर आरोप केले आहेत. लग्नाचं अमिष दाखवून, अत्याचार करणारा मुलीचा प्रियकरावर जितका दोषी आहे. तितकेच या घटनेला गांभीर्यानं न घेणारे पोलीस आणि पीडितेची अवहेलना करणारे शेजारीही तितकेच जबाबदार असल्याचा पीडितेच्या आईवडलांचा आरोप आहे. 2 ऑक्टोबर रोजी 19 वर्षीय पीडीत मुलीनं नालासोपारा पूर्व येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.  पीडित मुलीच्या कुटुंबात दोन भाऊ आणि आईवडील असा परिवार असून मुलीचे वडील मका विक्रीचा छोटासा व्यवसाय करतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram