Mamta Kulkarni : ममता कुलकर्णीवर अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप, मात्र कागदपत्र गहाळ झाल्यानं खळबळ
अभिनेत्री ममता कुलकर्णीवर अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप आहे. मात्र याबाबतची कागदपत्र गहाळ झाल्याने उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केलीय. ममता कुलकर्णीवर दाखल असलेला अमली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. मात्र कागदपत्र गहाळ झाल्यामुळे तीन वेळा सुनावणी रद्द करावी लागलीय. आता सर्व पक्षकारांच्या मदतीने पुन्हा कागदपत्र बनवण्याचे आदे मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.