लाचखोर शिक्षण अधिकारी Vaishali Veer यांना कोण वाचवतंय?निलंबनाच्या प्रस्तावानंतरसुद्धा कारवाई नाहीच

8 लाखांची लाच स्वीकारल्याचा आरोप असलेल्या शिक्षण अधिकारी वैशाली झनकर वीर यांना कोण वाचवतंय असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण वैशाली वीर यांच्या  निलंबनाचा तीन वेळा प्रस्ताव पाठवूनही कारवाई न झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय... कारवाई कुणामुळं रखडली असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केल्यानंतर छातीत दुखत असल्याचं कारण सांगत वैशाली वीर या नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यामुळं जिल्हा न्यायालयानं  शासकीय रुग्णालयाला नोटीस पाठवून, वैशाली वीर यांच्यावर काय उपचार केले यासंदर्भातला अहवाल मागितला आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola