काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारेच्या भावाला बलात्कारप्रकरणात अटक, सुनीत वाघमारे माजी स्वीकृत नगरसेवक
काँग्रेसचे माजी स्वीकृत नगरसेवक आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ता राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारेला लोणावळा पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. सुनीत वाघमारे यांच्या परिसरातच राहणाऱ्या महिलेने त्यांच्यावर बलात्कार, धमकावणे आणि लग्न करणार सांगून तीची फसवणूक करणे असे गंभीर आरोप लावत गुन्हा दाखल केला आला आहे.