Mumbai : गुन्हेगाराची चाळीतील रहिवाशांडून हत्या, हत्याप्रकरणात पत्नीसह कुटुंबाचाही सहभाग : ABP Majha
कुर्ल्यातील एका गुन्हेगाराची त्याच्या कुटुंबियांसह चाळीतल्या रहिवाशांनी मिळून हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या हत्येत गुन्हेगाराच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही हात होता. दीपक सांगळे असं हत्या झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. हत्येनंतर दीपक सांगळेचा मृतदेह घराच्या आवारात पुरण्यात आला होता. हा मृतदेह उद्या बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दीपक सांगळे हा 16 जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर हत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.