Anvay Naik Case प्रकरणी अर्णब गोस्वामींविरोधात आरोपपत्र, उद्या अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अलिबाग दंडाधिकारी न्यायालयात शुक्रवारी आपलं आरोपपत्र दाखल केलं आहे. अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार यात रिपब्लिक टिव्हीचे सर्वोसर्वा अर्णब गोस्वामींसह कंत्राटदार फिरोझ शेख आणि नितेश सारडा या दोन आरोपींविरोधात याप्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल आरोप लावण्यात आले आहेत. या आरोपपत्रात रायगड पोलीसांकडनं एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार खटला वर्ग होताना हे आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवलं जाईल. तिथं आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडेल, ज्यासाठी अर्णब गोस्वामींसह अन्य दोन आरोपींची उपस्थिती अनिवार्य राहील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola