Kidnapping CCTV : वांद्रे इथं १९ सप्टेंबरला 2 वर्षांच्या मुलीचं अपहरण, CCTV व्हीडीओ समोर

मुंबईत वांद्रे इथं १९ सप्टेंबरला झालेल्या दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा व्हीडीओ समोर आलाय. दोन वर्षांच्या मुलीचं अपहरण आशिक नावाच्या आरोपीनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसतोय. आशिक नावाचा हा आरोपी दिव्यांग असून तो दोन वर्षांच्या मुलीला घेऊन रेल्वे स्टेशनवरील लिफ्टमध्ये शिरताना दिसतोय. आरोपीला ड्रग्जचं व्यसन आहे असं पोलिसांनी सांगितलं. ज्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय तिचे कुटुंबीय आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. अपहरण झालेली मुलगी कुठे आहे आणि आरोपीनं मुलीचं अपहरण का केलंय याचा पोलीस तपास करतायत.... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola