Buldhana : लाच मागतानाचा पंचायत समिती अधिकाऱ्याचा व्हिडीओ, अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई नाही

Continues below advertisement

Buldhana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण केल्यावरही त्याचं बिल काढण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांनी 03 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार मोताळा पंचायत समिती मध्ये उघडकीस आला आहे. लाभार्थी शेतकाऱ्यानेच लाच मागतानाचा व्हिडीओ बनवून त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. अध्यापही संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. संपूर्ण जिल्ह्यात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram