Avinash Bhosale : ईडीकडून बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाखांची संपत्ती जप्त
Continues below advertisement
पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ED अर्थात सक्तवसुली संचलनालयाने ट्वीटरच्या माध्यमातून दिलीय. ईडीकडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. राज्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.
Continues below advertisement