नांदेडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांना जबर मारहाण, हे हल्ले कधी थांबणार?

कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आज वीकेंड लॉकडाऊन सुरू केलाय. या दरम्यान  नागरिकांनी बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आलंय. तर विनाकारण व विना मास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना दंडही ठोठावण्याचे प्रावधानही करण्यात आलेय. आज नांदेड व परभणी सीमेवर तपासणी पोस्ट वर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने विना'मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूध्द कारवाई करत  दंड ठोठावला असताना दुचाकी चालकाने दगड फेकून मारल्याने चुडावा पोलीस ठाण्यातील नाईक पो. कॉ. प्रभाकर निवृत्तीराव कच्छवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. गंभीर जखमी अवस्थेतील नाईक पो.कॉ. प्रभाकर कच्छवे यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून आरोपी दुचाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola