Aryan Khan मन्नत बंगल्यावर दाखल, फटाके वाजवत, घोषणा देत Shahrukh Khan च्या फॅन्सचा जल्लोष
Aryan Khan Bail : क्रूझ पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) अटक झाल्यानंतर, 26 दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) अखेर जामीनावर सुटका झाली. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आपल्या लेकाला घेण्यासाठी आला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत वकिलही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच, आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतही सज्ज झालं आहे. मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मन्नतबाहेरही चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. आर्यनच्या स्वागतासाठी त्यांच्याकडून घोषणाही देण्यात येत आहेत.
Tags :
Mannat Juhi Chawla Aryan Khan Aryan Khan News Aryan Khan Bail Aryan Khan Release From Jail Aryan Khan Jail Aryan Khan Jail Release Video