Anil Deshmukh : आधी CBI आणि आता ED च्या माध्यमातून त्रास देण्याचं काम : अनिल देशमुख
Continues below advertisement
सीबीआयने नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येतंय. शंभर कोटी वसुली प्रकरण तसेच बदल्यांसाठी पैसे घेण्यात आल्याच्या प्रकरणानंतर या पैशाचं नेमकं झालं काय याचा तपास ईडी करणार आहे. या पैशांचा वापर कसा करण्यात आला आहे, हवाला मार्फत ते बाहेर पाठवण्यात आले आहेत का किंवा कोलकात्यातील शेल कंपन्यांच्या माध्यमातून त्याची गुंतवणूक केली गेली आहे का या सर्वांचा तपास आता ईडी करणार आहे. कोलकात्यातील काही शेल कंपन्या अनिल देशमुखांच्या नातेवाईकांच्या नावे असल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Anil Deshmukh CBI Parambir Singh CBI Raid Anil Deshmukh Resign Anil Deshmukh Cbi Raid Cbi EDM ED Complaint