Hariyana Crime Brave Lady Video : महिलेच्या साहसाचं उत्तम उदाहरण, काठीच्या धाकाने पळवलं मारेकऱ्यांना
Continues below advertisement
महिलेचं साहस काय असतं याचं एक उत्तम उदाहरण हरियाणातून समोर आलंय. हरियाणाच्या भिवानीमध्ये एका व्यक्तीवर चार जणांनी गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारची महिला बाहेर आली, आणि तिनं केवळ काठीचा धाक दाखवून चौघांना पळवून लावलं. हरिकिशन असं हल्ला झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या एका सहकाऱ्याच्या हत्या प्रकरणात तो सहआरोपी आहे. आज सकाळी साडे सात वाजता हरिकिशन आपल्या घराबाहेर उभा होता. तेवढ्यात तिथं चार जण आले आणि गोळीबार सुरू केला. हरिकिशनला तीन गोळ्या लागल्या, त्याची परिस्थिती चिंताजनक आहे. त्याच्यावर रोहतकच्या PGIMS रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरिकिशन आणि ही महिला नातेवाईक आहेत की नाही ते अजून कळू शकलेलं नाही. तिनं दाखवलेलं साहस मात्र देशभरात चर्चेचा विषय ठरतंय.
Continues below advertisement