बक्षीस दिलं नाही म्हणून तृतियपंथियांकडून 3 महिन्यांच्या बाळाची हत्या,अपहरण करून बालिकेला जीवंत पुरलं
कफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत बक्षीस दिलं नाही म्हणून एका तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या जीवंत बाळाला खाडीत पुरून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि साथीदार सोनू काळे या दोघांना अटक केली आहे. मात्र या हत्ती याचं कारण जेव्हा कळलं तेव्हा एकच खळबळ उडाली.