World Cup 2019 | धवन, भुवनेश्वर पाठोपाठ विजय शंकरही दुखापतग्रस्त | ABP Majha
टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त शिलेदारांची यादी वाढत चालली आहे. शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्यापाठोपाठ या यादीत आता विजय शंकरच्या नावाची भर पडली आहे. भारतीय संघाच्या नेट्समध्ये बुधवारी फलंदाजी करताना जसप्रीत बुमराचा यॉर्कर विजय शंकरच्या तळपायावर आदळल्याने विजय शंकर दुखापतग्रस्त झाला आहे. बुरराहचा चेंडू विजय शंकर लागला त्यावेळी तो वेदनेनं कळवताना दिसला. भारतीय संघव्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार विजय शंकरच्या दुखापतग्रस्त तळपायातील वेदना आता कमी झाल्या आहेत. पण भारतीय संघाच्या आजच्या नेट्समध्ये तो सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे विजय शंकरच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे.