ICC World Cup 2019 | आपल्या षटकारानं दुखापतग्रस्त झालेल्या 'त्या' चाहतीला रोहित शर्माकडून कॅप भेट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2019 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
टीम इंडियाच्या बांगलादेशवरच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मानं त्या सामन्यानंतर आणखी एका भारतीय चाहतीची आवर्जून भेट घेतली. या तरुण चाहतीचं नाव मीना आहे. रोहितनं आपल्या शतकादरम्यान मारलेल्या एका षटकारानं मीनाला दुखापत झाली होती. त्यामुळं सामना संपल्यानंतर भारताच्या उपकर्णधारानं मीनाची भेट घेऊन तिची आस्थेनं चौकशी केली. रोहितनं मग तिला ऑटोग्राफ करून एक कॅपही भेट दिली. त्यामुळं मीनाची कळी भलतीच खुलली होती.