चीनची संरक्षणावर भारताच्या चौपट तरतूद
भारताच्या संरक्षण खर्चाबाबत नेहमीच टोमणे मारणाऱ्या चीनने यंदाच्या वर्षी आपल्या संरक्षण खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. 2018 साठी चीनने संरक्षण खर्चात तब्बल 175 अब्ज डॉलर्सची वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनचा एकूण संरक्षण खर्च जवळजवळ 11 हजार 380 अब्ज रुपये झाला आहे.