कापूस महासंघ अहवालानुसार भारताला कापसाची उत्पादकता सुधारण्याची गरज | 712 | एबीपी माझा
जगात कापूस उत्पादनामध्ये भारत अग्रेसर आहे. मात्र गेल्या काही वर्षात देशातील कापसाची उत्पादकता कमी झालेली दिसून आली आहे. राष्ट्रीय कापूस महासंघाने ही माहिती दिली, प्रति हेक्टर ७७० किलो अशी जगातील इतर देशांची कापसाची उत्पादकता आहे. भारताची उत्पादकता मात्र ५०० किलो प्रति हेक्टर इतकीच आहे. ही घटणारी उत्पादकता वेळीच सावरली नाही, तर भारत कापसाचा सगळ्यात मोठा आयातदार देश होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.