VIDEO | उत्तर प्रदेशातही फ्रंट फूटवरच खेळणार- राहुल गांधी | मास्टरस्ट्रोक | एबीपी माझा
प्रियंका गांधींच्या एन्ट्रीमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.तर, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासाठी प्रचार करायच्या. मात्र, त्यांच्याकडे पक्षाचं कोणतंही पद नव्हतं. त्यानंतर, गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते.