दिल्लीच्या प्रदूषणावर राहुल गांधींचं शायरीतून भाष्य
राजधानी दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शायरीचा आधार घेत भाष्य केलं आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील भीषण प्रदूषणाबाबत सरकारच्या मौनावर काँग्रेस उपाध्यक्षांनी शायरीतून प्रश्न उपस्थित केला आहे.
“सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है, इस शहर में हर शख़्स परेशान सा क्यों है? क्या बताएँगे साहेब, सब जानकर अंजान क्यों हैं?,” असं ट्वीट राहुल गांधी यांनी आपल्या अकाऊंटवरुन केलं आहे. 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गमन’ सिनेमाच्या गाण्यातील ह्या ओळी आहेत.