Vikhe | काँग्रेसच्या 4 आमदारांसह राधाकृष्ण विखे जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये : सूत्र | ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खचलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक आमदार, मुंबईतून एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत आहेत. विखे पाटील जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करतील, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. कालिदास कोळबंकर, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार हे आमदार विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. आणखी दोन आमदार भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.
Continues below advertisement