नवी दिल्ली : राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या चर्चा, आमदार अदिती सिंग यांच्याकडून वृत्ताचं खंडन
Continues below advertisement
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोहल्यावर कधी चढणार? हा विषय राष्ट्रीय प्रश्न असल्याप्रमाणे चघळला जातो. लग्नाबाबत फक्त राहुल यांनाच छेडलं जातं, असं नाही. रायबरेलीच्या काँग्रेस आमदारालाही राहुल गांधींशी लग्न करणार का? हा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे संतापून आमदार अदिती सिंग यांनी मौन सोडलं आहे.
राहुल गांधींसोबत लग्न ठरल्याच्या अफवांचं आमदार अदिती सिंग यांनी खंडन केलं आहे. 'तथ्यहीन अफवा ऐकून मी खरंच नाराज आहे. राहुलजी माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांना सन्मानाने राखी बांधते. आमच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याच्या वावड्या उठवणारे चुकीचे आहेत. माझी आणि राहुल गांधीजी यांची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा डाव आहे' असं अदिती सांगतात.
'कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. या अफवांमागे कोण असू शकतं, हे तुम्ही ओळखू शकता' असं सांगत अदिती सिंग यांनी विरोधकांकडे अंगुलीनिर्देश केला.