कॉमनवेल्थ 2018 : राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान सुशील कुमारला सुवर्णपदक
Continues below advertisement
ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कुस्तीचं मैदान आज भारताच्या पैलवानांनी गाजवलं. बबिताकुमारी फोगट, राहुल आवारे, किरण यांनी पदकांचा पाया रचल्यानंतर, ऑलिम्पिकमधील पदकविजेता भारताचा पैलवान सुशील कुमारनेही सुवर्ण कामगिरीने कळस चढवला.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुशील कुमारने 74 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथाचा पराभव केला.
सुशीलने इतक्या वेगाने कुस्ती खेळली की, अवघ्या 80 सेकंदात त्याने डाव जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर 10-0 ने मात करत सुशीलकुमारने अवघ्या 80 सेकंदांत पदक खिशात घातलं.