Commonwealth Games 2018 : पैलवान विनेश फोगाटला 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक
पैलवान विनेश फोगाट आणि सुमीत मलिकनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताला कुस्तीत दोन सुवर्णपदकांची कमाई करून दिली. पण ऑलिम्पिक कांस्यविजेती साक्षी मलिक आणि सोमवीरला कांस्यपदकांवर समाधान मानावं लागलं. महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनोश फोगाटनं तिन्ही साखळी सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. तिनं नायजेरियाची जेनेसिस, ऑस्ट्रेलियाची रुपिंदर कौर आणि कॅनडाची जेसिका मॅकडोनाल्ड यांना हरवलं. पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटातही सुमीत मलिकनं राऊंड रॉबिन पद्धतीनं चारही कुस्त्या जिंकल्या. साक्षी मलिकनं महिलांच्या ६२ किलो, तर सोमवीरनं पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाचं कांस्यपदक पटकावलं.