Commonwealth Games 2018 : वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराजाला रौप्यपदक
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत गुरुराजाने भारताला मिळवून दिलेलं हे पहिलं पदक ठरलं.