Commonwealth Games 2018 : बॉक्सिंगमध्ये मेरी कोमची सुवर्ण पदकाची कमाई
Continues below advertisement
21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून पदकांची लयलूट सुरुच आहे. बॉक्सर मेरी कोमनं भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने बाजी मारली. अंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत, मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. भारताच्या खात्यात आता 43 पदकं जमा झाली असून, यात 18 केवळ सुवर्ण पदकं आहेत. भारताच्या एकूण पदकांमध्ये 19 सुवर्ण, 11 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे. मेरी कोमनं आपलं सुवर्ण पदक तिन्ही मुलांना डेडिकेट केलंय. यासंदर्भात मेरीनं ट्विटही केलंय.
Continues below advertisement