कोलंबिया : हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2018 12:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोलंबियात हेलिकॉप्टरचा एक अत्यंत भीषण अपघात झाला. कोलंबियाच्या डोंगराळ भागात एक मिनी हेलिकॉप्टर इलेक्ट्रिक फेल्युअरमुळे क्रॅश झालं होतं. त्या हेलिकॉप्टरच्या मदतीला दुसरं हेलिकॉप्टर गेलं असता हा अपघात घडला. इव्हान नावाचा व्यक्ती आधी क्रॅश झालेले हेलिकॉप्टर पाहण्यासाठी खाली उतरला होता. त्याचदरम्यान पायलेट जुआन कार्लोसने हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे टीमला वर चढता येईल असं त्याला वाटलं. पण अचानक संतुलन बिघडल्याने हेलिकॉप्टर डावीकडं झुकलं. त्यामुळे दुसरीकडे उभा असलेल्या इंजिनीअर इव्हानचा मृत्यू झाला.