खेळ माझा : मोहम्मद शमीच्या पत्नीच्या आरोपांमधून मॅचफिक्सिंगचे संकेत
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर झालेल्या मॅचफिक्सिंगच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी हे आदेश दिले आहेत. शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात मोबाईलवर झालेल्या संभाषणाची या चौकशीत तपासणी होईल. शमीनं इंग्लंडमधल्या एका व्यावसायिकाकडून एका पाकिस्तानी महिलेमार्फत पैसे घेतल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं या संभाषणात केला आहे.