VIDEO | देवेंद्र फडणवीस यांचं बेस्टच्या संपावर वक्तव्य | नवी दिल्ली | एबीपी माझा
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर चौथ्या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. आधी संप मिटवा मग चर्चा करु असं आवाहन पालिका प्रशासन आणि राज्य सरकारने हायकोर्टात कर्मचारी संघटनांना केलं होतं. मात्र तोडगा काढल्य़ाशिवाय संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर कर्मचारी संघटना ठाम आहेत. दरम्यान, परळमध्ये बेस्ट कृती समितीच्या कामगार मेळाव्याला सुरुवात झाली असून या मेळाव्यात बेस्टच्या संपाचं भवितव्य ठरणार आहे. तर या संपाबाबत राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची उद्या सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात देण्यात आली.