VIDEO | नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील शहिदांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री गडचिरोलीत | एबीपी माझा
गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यातील शहीदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली. गुरुवारी नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात कुरखेडा क्विक रिस्पॉन्स टीमचे 15 जवान शहीद झाले. तर गाडीच्या चालकाचाही मृत्यू झाला. त्यानंतर आज मुख्यमंत्री गडचिरोलीला गेले. तिथं त्यांनी शहीदांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहीदांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. मुख्यमंत्र्यांनी शहिदांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.