मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर तीव्र शब्दात घणाघात | औरंगाबाद | एबीपी माझा
पाच राज्यांच्या निवडणुका जिंकल्यानं काही जणांना पिसं फुटली आहेत. तर काही जण हवेत गेले आहेत. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत या राज्यात भाजपला सर्वाधिक जागा येतील अशी आशा देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस पक्षाला मध्यस्थ मिळाला नाही म्हणून काँग्रेसने राफेलची डिल रोखली. असंही मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय जनता मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यशाळेत मुख्यमंत्री बोलत होते.