EXCLUSIVE | भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत | एबीपी माझा
सरकारने ईडी आणि एजन्सीचा वापर केला असता काँग्रेस-राष्ट्रवादीचे शीर्षस्थ नेतेही राहिले नसते असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. यावेळी त्यांनी शरद पवारांही जोरदार प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादींनी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जातीयवादाचं विष पेरलं असा गंभीर आरोप त्यांनी केला. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता मनसे नाही तर उनसे अर्थात उमेदवार नसलेली सेना आहे. अशा शब्दात राज ठाकरेंची खिल्ली उडवली. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.