मुंबई : पूजेला विरोध करणारे छत्रपती शिवरायांचे मावळे असूच शकत नाहीत, मुख्यमंत्र्यांची टीका
Continues below advertisement
वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेत शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मी पूजेला आलो असतो तर गर्दीत साप सोडण्याचा, चेंगराचेंगरी घडवण्याचा कट होता, अशी माहिती गुप्तचर विभागानं दिल्याचा गंभीर दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे १० लाख भाविकांच्या सुरक्षेसाठीच आपण पूजेला अनुपस्थित राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या निर्णयाचं वारकऱ्यांनीही स्वागत केलं आहे. दरम्यान, पूजेला विरोध करु पाहणाऱ्यांवर त्यांनी जोरदार शब्दात टीकास्त्र सोडलं. वारीच्या परंपरेत खोडा घालू पाहणारे शिवरायांचे मावळे असू शकत नाहीत, असं म्हणताना अराजक माजवणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. दरम्यान, आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचं नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली आहे.
Continues below advertisement