नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती टाळली

Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सहभाग असलेल्या 'सेव्ह रिव्हर' या व्हिडिओवर काँग्रेसने निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 'नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रमा'ला जाणंच टाळलं. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावली.

मुंबईत दहीसरमध्ये आज सकाळी सात वाजता 'नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री या कार्यक्रमाला गेलेच नाहीत. व्हिडिओत झळकलेले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि भाजप आमदार राम कदम मात्र कार्यक्रमाला उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram