चिपळून : 7/12वरून परशुराम देवस्थानचं नाव कमी करण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन

Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यातील पेढे आणि परशुराम या दोन  गावातील हजारो लोक आज रस्त्यावर उतरली आहेत. या दोन गावातील जमिनीवर १९७० नंतर सरकारनं  परशुराम देवस्थानचं नाव लावलं आणि तेव्हापासून या गावांचा विकास ठप्प झाला. प्रत्येक शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर शेतकऱ्याच्या नावाबरोबर देवाचं नाव असल्यानं ना इथला शेतकरी आपल्या जमिनीत घर बांधू शकत ना इथं बँकेचं कर्ज मिळतं. इतकेच काय तर १९७० नंतर या गावात आलेल्या नुकसानभरपाईचा एकही रुपया या गावातील शेतकऱ्याला मिळाला नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram