मुंबई-महाराष्ट्रावरचा धोका टळला, चिनी स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चीनची प्रयोगशाळा मुंबई किंवा महाराष्ट्रातील एखाद्या भागात कोसळण्याचा धोका टळला. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चिनी स्पेस स्टेशनचे तुकडे झाले आणि पॅसिफिक महासागरात कोसळले. टीयाँगाँग हे चिनी स्पेस स्टेशन साधारण स्कूल बसच्या आकाराचं होतं.
इस्टर्न डे टाईमनुसार रविवार एक एप्रिलच्या रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5 वाजून 16 मिनिटांनी दक्षिण प्रशांत महासागरात कोसळलं. टीयाँगाँग 34 फूट लांब आणि 11 फूट रुंद होतं, तर त्याचं वजन 9 टनापेक्षा जास्त होतं.