चंद्राच्या अंधाऱ्या बाजूवर यान पाठवणारा चीन पहिला देश | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
चीनच्या अंतराळ मोहिमेचा सर्वात महत्वाचा टप्पा पूर्ण केल्याचा दावा आता केला जात आहे कारण पृथ्वीवरून चंद्राचा जो भाग दिसत नाही, त्या अंधाऱ्या भागावर यानाचं यशस्वी लँडिंग चीननं केलं आहे. चँग-४ या मोहिमेअंतर्गत हे लँडिंग झाल्याचा दावा केला गेलाय. चीनचं चँग 4 हे यान आज सकाळी चंद्राच्या दुसऱ्या बाजूला उतरवलं. चंद्राच्या दुसऱ्या भागात यान उतरवणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. ज्या भागात चीनचं हे यान उतरलं आहे, तो भाग कायम अंधारातच राहतो, त्यामुळं या भागात अनेक रहस्य दडलेली असू शकतात असा अंदाज शास्रज्ञांना आहे.