महिला प्रवासी-चालकाचा वाद 15 जणांच्या जीवावर, चीनमध्ये बस नदीत कोसळली | एबीपी माझा

चीनमध्ये सार्वजनिक वाहतूक करणारी बस यांगत्से नदीत कोसळून भीषण अपघात झाला. महिला प्रवासी आणि बसचालकाचा वाद 15 प्रवाशांच्या जीवावर बेतला. चीनमध्ये रविवारी झालेल्या बस अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या सिटी बसने अचानक लेन कट केली. समोरुन येणाऱ्या कारला उडवत पुलाचा कठडा तोडून ती बस नदीत कोसळली. बसमध्ये ड्रायव्हरसह 15 प्रवासी होते. चार दिवसानंतर बस बाहेर काढण्यात आली, तेव्हा 13 जणांचे मृतदेह हाती आले, तर दोघे बेपत्ता होते. सीसीटीव्ही फूटेज आणि बसमधील ब्लॅक बॉक्समुळे या अपघातामागील कारण समोर आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola