नवी दिल्ली : देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन पदावरुन पायउतार
Continues below advertisement
नवी दिल्ली: माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यानंतर आता आणखी एका अर्थतज्ज्ञाने मोदी सरकारला रामराम केला आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली. अरविंद सुब्रमण्यन हे कौटुंबीक कारणामुळे अमेरिकेला परतणार आहेत. त्यामुळे आपल्याला पदमुक्त करावं, अशी विनंती त्यांनी केली होती. कौटुंबीक कारण पुढे केल्याने आपल्याकडे पर्याय नव्हता, असं अरुण जेटली यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Continues below advertisement